मी आपल्या मंद्रूप ग्रामपंचायत येथून प्रथमच पदासाठी लागलेल्या  स्वतंत्र सरपंच निवडणूकीसाठी अपक्ष उमेदवार महणून उभा आहे. मला समाजकारण व राजकारणाची पूर्वीपासूनच  आवड आहे. माझ्या घरातील माझे काका श्री. सिद्धप्पा सोमाणणा काळे यांनी उपसरपंच पदावर कार्य केले आहे. तांच्या सानिध्यात राहून मी समाजकारण व राजकरणाचे धडे गिरवले आहे. आजची आपल्या मंद्रूपची सध्याची स्थिति पाहून मलाही या निवडणूकीत उभे राहून मंद्रूपचा  संपूर्ण विकास करण्याची संधी दिसत आहे. महणून आपल्या आशिर्वादाच्या जोरावर मी ही  सरपंच पदाची निवडणूक लढवीत   आहे. तरी आपण माझ्यासारख्या सामान्य सुशिक्षित उमेदवाराच्या माघे खंबीरपणे उभे राहताल हा विश्वास आहे. याच विश्वासाच्या जोरावर मी हे निवडणूकीचे शिवधनुष्य उचलले आहे. तरी आपले बहुमोल मत आशिर्वादाच्या रूपात मला मिळेल ही आशा वाटते. येणार्‍या निवडणूकीत मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवित असून आपणा सर्वांचे आशीर्वाद व मनोबल माझ्या पाठीशी असावेत ही नम्र विनंती.

 
   
  : You are Visitor No. :

 
 

All Rights Reserved @ Gaju Amoghsiddh Kale                       Developed By gr8ad.in to Advertise Call +91-8857804254